Tuesday, December 5, 2023

निवडणूक प्रचाराला आलेल्या BRS खासदाराला भोसकले, धक्कादायक घटनेचा व्हिडिओ

तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणातील सत्ताधआरी भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएसचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान रेड्डी यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या रेड्डी यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातल्या सिद्धीपेट जिल्ह्यातील दौलताबाद मंडलातील सूरमपल्ली गावात निवडणूक प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने खासदार कोठा प्रभाकर रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रेड्डी यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खासदार रेड्डी यांना तात्काळ सिकंदराबादच्या रुग्णालयात नेण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: