व्यापार्यावर हल्ला करुन लुटले; संदेश कार्लेंंनी घेतली आक्रमक भूमिका
अहमदनगर – नेप्ती उपबाजार समिती परिसरात बायपास रोडला एका व्यापार्यावर हल्ला करुन रोकड पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे नगरमध्ये एकच खळबळ उडाली असून व्यापार्यांध्ये घबराहटीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्यापार्यांची भक्कम बाजू मांडत पोलिसांना आंदोलनस्थळी येऊन निवेदन घेण्यास भाग पाडले. दरम्यान शेतकरी, गाडीवाले यांना ट्रॅफीक पोलिस, आरटीओ त्रास देत आहेत. याबाबत पुन्हा तक्रारी आल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्ले यांनी दिला.
नेप्ती कांदा मार्केट मधील आडत व्यापारी सय्यद बंधूंवर बायपास रोडवर अज्ञात हेखोरांनी तलवार, कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या जवळील सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त रोकड पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि.7) सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. नेप्ती कांदा मार्केट मधील समीर ट्रेडींग कंपनीचे समीर सय्यद व सोहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सय्यद बंधू हे सकाळी 11 च्या सुमारास कार मधून नगरकडून नेप्ती कांदा मार्केट कडे जात होते. केडगाव बायपास चौकातून बायपास रस्त्याने ते नेप्ती कांदा मार्केट कडे वळाले. चौकाच्या काही अंतर पुढे आल्यावर एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांची कार थांबताच अन्य वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत दोघा बंधूंवर तलवार, कोयत्याने वार केले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कारमीध्ये ठेवलेली पैशांची बॅग घेवून तेथून पोबारा केला. या बॅगमध्ये कांदा उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी आणलेली 50 लाखांपेक्षा जास्त रोकड होती. व्यापार्यावर हा झाल्याची माहिती कळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रुख संदेश कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापार्यांची भक्कम बाजू मांडली. व्यापार्यांसाठी आवाज उठवला. पोलिसांना आंदोलनस्थळी येऊन निवेदन घेण्यास भाग पाडले.
दरम्यान, शेतकरी, गाडीवाले यांनी ट्रफिक पोलीस व आर टी ओ हे कांदा घेऊन येतांना फार त्रास देतात असे सांगितले. असा प्रकार झाल्यास केव्हाही आच्याशी संपर्क साधा. शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल अशी भूमिका कार्ले यांनी मांडली. तसेच डीवायएसपी खैरे यांनीही मदतीचे आश्वासन दिले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत शेतकर्याची कांदा पट्टी चोरीला गेल्या. त्यांनाही कोतवालीला बोलवून खात्री करून पट्टी परत मिळवून देण्याचे मान्य केले. यावेळी मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक, व्यापारी, शेतकरी, हाल, टेम्पोवाले अनेक जन उपस्थित होते.