अहमदनगर शहरातील अट्टल मोबाईल चोर कोतवाली पोलीसांकडुन १२ तासाचे आत जेरबंद
दि.२१/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे प्रविण रामदास खेडकर वय २० वर्षे रा. विनोद भोसले यांचे घरामध्ये भाडोत्री बुरुडगावरोड अहमदनगर मुळ रा. चिंचपुर ईजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांचा दिनांक २०/०९/२०२४ रोजी रात्री ००:१५ वाचे सुमा पासुन ते दि. २१/०९/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वाचे दरम्याण फिर्यादीचा ते राहत असलेल्या घरातुन त्यांचा १२,०००/-रुपये किंमतीचा पांढरे रंगाचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन हा तसेच त्यांचे रुम पार्टनर यांचे ३ मोबाईल हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेला आहे. वगैरे मा च्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं। १०३८/२०२४ बीएनएस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे सो यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मोबाईल फोनची चोरी हि अहमदनगर शहरातील रहीवाशी असलेल्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने केलेली आहे. अशी माहीती मिळाल्याने गुन्हेशोध पथकाने अहमदनगर शहरातील भांबळगल्ली, परिसरात जावुन पाहणी केली अता एक संशयीत इसम मिळुण आला त्याचेकडे मोबाईल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे व असमाधान कारक उत्तरे दिल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यास कोतवाली पोलीस ठाणेत घेवुन आले असता त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) परवेज मेहमुद सय्यद वय २३ वर्षे रा. भांबळगल्ली बुरुडगाव रोड अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन बुरुडगाव परिसरातील घरामधील मोबाईल चोरी केले असले बाबत सांगितले. व दोन पंचाचे समक्ष चोरी केलेले मोबाईल हजर केले त्यांचे वर्णन १) १२,०००/-रुपये किंमतीचा पांढरे रंगाचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन २) १२,०००/-रु किंचा काळया रंगाचा समसँग कंपनीचा गॅलेक्सी एम ११ मोबाईल फोन ३) ०९,०००/-रु किंचा एक निळया रंगाचा रेडमी ७ कंपनीचा मोबाईल फोन ४) १०,०००/-रु किंचा आकाशी रंगाचा समसँग कंपनीचा ए-३२ मोबाईल फोन असा एकुन 43,000/-रु किंमतीचा चोरीचा मुददेमाल मिळुन आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हा सफौ/ वसंत सोनवणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सोो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनी विकास काळे गुन्हे शोध पथकाचे सफौ / वसंत सोनवणे, पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, विशाल दळवी, विजय काळे,सलीम शेख, पोकाँ अभय कदम, अतुल काजळे,सतीष शिंदे, सोमनाथ राऊत तसेच मोबाईल सेलचे पोकॉ/प्रशांत राठोड आदिंच्या पथकाने केली आहे.