Sunday, July 21, 2024

Ahmednagar crime :पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, चौघे ताब्यात

अहमदनगर -कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली. सुप्याकडून नगरच्या दिशेने बोलेरो पिकअपमधून गोवंशीय वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनेवाडी चौक, केडगाव येथे हा पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला.

चालकाने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या निरंजन कारले याच्या हातावर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले. पथकाने वाहनचा पाठलाग करून झेंडीगेट येथे पिकअप फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतला. त्यातून 32 वासरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आलक्या कृष्णा काळे (वय 50), संदीप आलक्या काळे (वय 24), आलेश काळे (वय 22), अशोक आलक्या काळे (वय 26, सर्व रा. औसरी खुर्द, ता. आंबेगाव) या चौघांना ताब्यात घेतले. अंमलदार राजेंद्र चंद्रभान पालवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles