9 ऑगस्ट रोजी जप्त वाळू साठ्याच्या लिलाव नेवासा तहसिल कार्यालयात
इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी व्हावे
अहमदनगर :- नेवासा तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या मौजे सुरेगाव गंगा,घोगरगाव तसेच मौजे बोरगाव येथे वाळू साठ्यांचा लिलाव अटी व शर्तीच्या अधिन राहुन 9 ऑगस्ट, 2024 रोजी सायं.4-00 वाजता तहसिल कार्यालय, नेवासा येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मौजे सुरेगाव येथे अनाधिकृत असा 125 ब्रास रेतीसाठी आढळून आला असुन मौजे घोगरगाव येथे 50 ब्रास तर मौजे बोरगाव येथे 30 ब्रास अनाधिकत असा रेतीसाठी आढळून आला आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नेवासा येथे उपलब्ध असुन इच्छुकांनी या लिलावात सहभाग नोंदवावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.