जप्त केलेल्या वाहनांचा 5 मार्च रोजी लिलाव
अहमदनगर दि. 1 मार्च :- राहुरी तालुक्यातील चाळुचोरी विरोधी पथकांनी मुळा,प्रवरा नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करत असताना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत केले आहेत. वाहन मालकांनी दंडात्मक रक्कम शासन जमा न केल्याने अशा वाहनांचा लिलाव 5 मार्च, 2024 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसिल कार्यालय, राहुरी येथे करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासन जमा करावी. अन्यथा जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच लिलावाच्या अटी व शर्तीसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे तहसिलदार, राहुरी यांनी कळविले आहे.