वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १८ वा सामना बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरूतील चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स मोठ्या संख्येने हजर होते.
दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करण्यासाठी आलेला क्रिकेट फॅन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानी फॅन्ससह भारतीय फॅन्स देखील मैदानावर उपस्थित होते. या सामन्यात भारत माता की जय चा जयघोष सुरू असताना,ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन देखील भारत माता की जयच्या घोषणा देताना दिसून आला आहे
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,खांद्यावर ऑस्ट्रेलियाचा झेंडा अन् डोक्यावर ऑस्ट्रेलियाची कॅप असलेला फॅन ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
An Australian fan chanting 'Bharat Mata Ki Jay'.
– Video of the day! 🇮🇳pic.twitter.com/v5tuOxrJ6v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023