Monday, June 23, 2025

Video: स्वयंपाकघरात थंडगार हवेसाठी पट्ठ्याने केला ‘असा’ जुगाड

उन्हाळ्यात स्वयंपाक घरात जेवण करताना प्रचंड गरम होते. गॅस चालू असल्यामुळे त्यातून निघणारी आग, जेवण बनवताना त्यातून निघणारी वाफ आदी गोष्टींमुळे गृहिणींच्या अंगाची लाही होते. गॅस चालू असल्यामुळे आपण पंखा देखील चालू करू शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात स्वयंपाक घरात जेवण बनवणे कठीण जाते. पण, आज व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने यावर एक उपाय शोधून काढला आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहे. यावेळी गरमी पासून वाचण्यासाठी त्याने टेबल फॅनचा अनोखा जुगाड केला आहे. सगळ्यात पाहिला टेबल फॅनला त्याने स्टूलला बांधले आहे आणि मग तोच स्टूल त्याच्या पाठीवर टांगून ठेवला आहे. फॅनची कॉर्ड सॉकेट बोर्डला जोडलेली दिसते आहे. एकदा पाहाच तरुणाने केलेला हा अनोखा जुगाड.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles