अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अवतार असल्याचं चंपत राय म्हणाले आहेत. चंपत राय हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी हे विधान केलं.
पंतप्रधान मोदी हे या देशाचे भगवान विष्णूचे अवतार आहेत. भारतीय परंपरेत राजा हा विष्णूचा अवतार आहे. ते देशातील लोकशाहीचे सर्वमान्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते जगात भारताचे प्रतिनिधित्व करतात”, असं विधान चंपत राय यांनी केलं.
अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारीला मोठा अभिषेक सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 6000 लोकांना बोलावण्यात आले आहे. राम लल्लाच्या या सोहळ्याला पंतप्रधान यजमान म्हणून उपस्थित राहणार नाहीत तर भक्त म्हणून उपस्थित राहणार आहेत, असंही चंपत राय यांनी सांगितलं.