22 जानेवारी 2024 ला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहतील. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील 86 वर्षीय वैदिक विद्वान पं. लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करतील. सांगण्यासारखी गोषअट म्हणजे पं. दिक्षीत यांच्या पिढीचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला होता. काशीचे गागा भट्ट यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी शिवरायांचा अभिषेक केला होता.आमची मुळे महाराष्ट्रातील सोलापूरजवळील जेऊर गावात आहेत. आमचे पूर्वज काशीला गेले आणि त्यांनी आपले जीवन हिंदू परंपरा आणि विधींच्या अभ्यासासाठी समर्पित केले,” असे मथुरानाथ दीक्षित म्हणाले. लक्ष्मीकांत दीक्षित हे गागा भट्ट यांचे वंशज आहेत.