अयोध्या राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र लक्ष्मणाची भुमिका निभावणारे सुनील लाहिरी यांना या दिमाखदार कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील लाहिरी म्हणाले, ‘प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. काळजी करण्यासारखे काही नाही. कदाचित त्यांना मी आवडलो नसावा असं ते म्हणाले. यानंतर सुनील लाहिरी यांनी ‘रामायण’च्या निर्मात्यांनाही आमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘कदाचित त्यांना वाटत असेल की लक्ष्मणचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडलो नसावा.