देशासहित राज्यातही तळीरामांची संख्या वाढत चालल्याचं दिसून येत आहे. अनेक संस्थांच्या आकडेवारीतून ही माहिती अनेकदा समोर आली आहे. शहर असो ग्रामीण या दोन्ही भागात तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. घरातील एका व्यक्तीच्या दारुच्या व्यसनाचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. त्यामुळे घरातील मंडळी या व्यक्तीला दारू सोडण्याविषयी सूचना करत असतात. अशाच प्रकारे एक तरुण भोंदू बाबाकडे दारू सोडवायला गेला. मात्र, या तरुणाला भोंदू बाबाने चांगलाच कुटला. बाबाकडून मारहाण होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://x.com/vishalvijay5454/status/1806706626520346800?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1806706626520346800%7Ctwgr%5E93766dff2900e76c308ab9f4eb8bb7a16c4b2881%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fbaba-beat-the-young-man-who-came-to-get-rid-of-his-addiction-video-viral-on-social-media-vvg94
Video : दारू सोडवायला गेला अन् बाबाने चांगलाच कुटला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- Advertisement -