Monday, April 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून घोलप हे नाराज असल्याची होती. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते.उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. अखेर गुरुवारी (१५ फेब्रुवारी) बबनराव घोलप यांनी शिवसैनिकपदाचा राजीनामा दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles