विधानसभा निवडणुका जसजसा जवळ येत आहेत, तसतसं जागावाटपाच्या चर्चेनं जोर धरलाय. पण त्याआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीमधील मित्रपक्षाने साथ सोडली आहे. ठाकरे सरकारच्या काळत मंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांनी महायतीमधून बाहेर पडल्याचे सांगितलेय.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडली होती. महायुतीमध्ये बच्चू कडू सामील झाले होते. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली होती. आता विधानसभा निवडणुकीआधी बच्चू कडू यांनी मोठं पाऊल उचलले आहे. बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची निर्मिती केली आहे. ते विधानसभेला मैदानात उतरणार आहेत.
मी महायुती बाहेर पडलो आहे हे स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? आता मी इथं आलोय.. महायुती सोडली.. असे बच्चू कडू म्हणाले.