Saturday, January 25, 2025

मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाकडून…तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. बहुमतानंतर राज्यात महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस होऊन गेले तरीही सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. एवढंच नाही तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या सरकारबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं. तसेच याच बैठकीत राज्याचा मुख्यमंत्री देखील ठरल्याचं बोललं जातं. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सस्पेंस कायम आहे.

तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे गृहखातं मागितलं असल्याची चर्चा आहे. पण गृहखातं शिवसेनेला देण्यास भाजपाचा विरोध आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच ते दोन दिवस दरेगावी गेले होते. त्यामुळे महायुतीत नेमकी काय चाललंय? यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता माजी आमदार बच्चू कडू यांनी या सर्व घडामोडींवर मोठं भाष्य केलं आहे. “भारतीय जनता पक्षाकडून तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, हे मी एकनाथ शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांची भाजपाकडून कोंडी होत आहे का? याबाबत आता अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles