रासपला महायुतीकडून लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे. महादेव जानकर महायुतीसोबत राहणार आहेत, असं त्यांनी आमच्याकडे स्पष्ट केलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर आजच्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली. महायुतीकडून लोकसभेची एक जागा जानकर यांना दिली जाणार आहे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांनी महायुतीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या बैठकीला रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते