Sunday, December 8, 2024

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर….’बदला’ पूर्ण… दोन पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून रोख बक्षीस जाहीर

बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं समर्थन केलं आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे की “बदला… पुरा… बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची बातमी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर पाहिली. एन्काउंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता, पहिला विचार जो आला, तो एकच… त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळाला… या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील. एन्काउंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील. अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करूच शकत नाही, पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला, असे अनेक तर्कवितर्क लढवले जातील. परंतु, जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो, त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं?”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles