Saturday, December 9, 2023

मराठा आरक्षणासंदर्भात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मोठं वक्तव्य म्हणाले…

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणास बसले होते. पण, सरकारच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. आता मराठा आरक्षणावर बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी भाष्य केलं आहे.

“मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,” असं म्हणत धीरेंद्र शास्त्रींनी पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान दरबार भरणार आहे. रविवारी ( ६ नोव्हेंबर ) धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण, जेव्हा देश गुलामगीरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम मराठा समाजानं केलं. सरकारनं मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण दिलं पाहिजे. बागेश्वर पीठ मराठा समाजाबरोबर आहे.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d