Saturday, February 15, 2025

Bajaj Auto…जगातील पहिली CNG बाईक पुण्यात…गडकरींच्या हस्ते लाँचिंग

Bajaj Auto पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची आता लवरकरच मुक्तता होणार आहे. कारण, बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सीएनजी बाईक ही “बजाजची गॅरंटी” आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात ‘नितीन गडकरींची गॅरंटी’ असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्र्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. https://x.com/FirstCNGBike/status/1808821931807818100

125 सीसीचं इंजिन असणारी ही बाईक 2 किलो सीएनजी टाकीची क्षमता ठेवते. सध्या लाँच झालेल्या तीन बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या तिन्ही बाईकची किंमत अनुक्रमे 95 हजार, 1 लाख 5 हजार आणि 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. – 125 सीसी
– 2 किलोची सीएनजी टाकी
– सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे.
– सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट घेण्यात आलं आहे.
– 2 लिटर पेट्रोल टँकही आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles