Bajaj Pulsar बजाज ऑटो आता दुचाकी उत्पादनात बदल करत आहे, देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या वाहन पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नवीन बजाज पल्सर रेंज तसेच १०० सीसी सेगमेंटमधील सीएनजी बाइकचे संकेत त्यांनी दिले. बजाज ऑटो या आर्थिक वर्षात त्यांची पल्सर श्रेणी अपग्रेड करण्याबरोबरच आजपर्यंतची सर्वात मोठी पल्सर बाइक देखील लॉन्च करेल. बजाज ऑटोचे या सेगमेंटमध्ये नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आहे.
एप्रिल २००६ मध्ये, राजीव बजाज यांनी सूचित केले होते की कंपनी नवीन उत्पादनावर काम करत आहे. पेट्रोलशिवाय सीएनजीवरही चालणार आहे. या बाईकमध्ये दुहेरी इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता सीएनजी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत असताना बजाज ऑटो सीएनजी बाईकची तयारी करत आहे की काय, या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे.