चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ, असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी फायनल गमावल्याने पक्षात उलट सुलट चर्चांना सुरूवात झालीये. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील उमटतील आणि त्याची परिणीती महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते फुटण्यात होईल, अशी चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. मात्र राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे, असं ठामपणे विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
विरोधी पक्ष एकजुटीने लढतो…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 4, 2023