Sunday, December 8, 2024

अजित पवारांच्या बंडावर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले….तेव्हाच सिग्नल

अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.

“काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “करोनाच्या संकटात आम्ही चांगल्या पद्धतीने अडीच वर्षे काम केलं. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आम्हाला वाटत होते. पण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडले, तेव्हा धक्का बसला. या बंडाचा वास सुद्धा आला नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं.
अजित पवार सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे. हे जाणवत होते. अजित पवारांनी २०१९ सालीही शपथ घेतलीच होती. भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही आघाडी तोडण्याची गरज वाटत असणार. त्यातून काही गोष्टी घडतील हे वाटत होते. कारण, अजित पवारांची काम करणे आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता, हे घडणार याची कुणकुण लागली होती. शरद पवार यांचा राजीनामाही त्याचेच सिग्नल होता,” असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles