कांदा निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली असून ही बंदी मार्च २०२४ पर्यंत वाढविली आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. मात्र कांदा निर्यातीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क सुरु असून लवकर मार्ग निघेल; असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पन्नास रुपये किलो विकणारा कांदा आज २५ रुपये किलोवर आला. त्यामुळे आधी दुष्काळ गारपीट अशा प्रश्नांना शेतकरी सामोरे जात असताना निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याच्या उरल्या सुरल्या कांद्याला देखील योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे.
कांडा निर्यात बंदीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला असून निर्यात बंदी उठवण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. लवकरच या प्रश्नावर आम्ही तोडगा काढून अस आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले.
कांदा निर्यात करण्यावर बंदी… कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले….
- Advertisement -