बांगलादेशमध्ये सध्या राजकीय गोंधळ माजला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चक्क आपला देश सोडून भारतात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकारांनी थेट त्यांच्या घरावरच हल्ला केला लोकांनी त्यांच्या घरामधील एक एक वस्तू उचलून नेली. अगदी भांडीकुंडी, पाळीव प्राणी, कोंबड्या, बदकं, सोफा, बेड, अंथरूण, टीव्ही, फ्रीज अगदी हातात मिळेल त्या वस्तू उचलून नेल्या. एवढंच नाही तर काही लोकांनी आपल्या संसदेवर देखील हल्लाबोल केला. आणि तिथल्या वस्तू देखील पळवून नेल्या. या घटनेचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. https://x.com/RealBababanaras/status/1820413947377254465