मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पोस्ट कार्यालयांमध्ये
बँक खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध
अहमदनगर, दि. 8 जुलै :- भारतीय डाक अहमदनगर विभागासह राज्यातील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत बँक खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महिलांनी पोस्ट कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अथवा पोस्टमनशी संपर्क साधुन खाते उघडून घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते उघडल्यामुळे महिलांना सरकारमार्फत थेट लाभ हस्तांतर योजजनेंतर्गत नमूद केलेल्या सर्वच योजनांचे लाभ मिळु शकतात.यासाठी महिलांनी जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये केवळ आपले आधारकार्ड व मोबाईल घेऊन गेल्यास खाते उघडून दिले जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खाते उघडल्याने महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.