Wednesday, April 17, 2024

बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ, सात लाख कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार

बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर आज (दि.8) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 10 खाजगी आणि 3 विदेशी बँकातील सात लाख बँक कर्मचारी (Bank Employees) तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असणार आहे. त्यामुळे जवळपास 7 कर्मचाऱ्यांना या पगार वाढीचा लाभ होणार आहे. बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

लागू होणाऱ्या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी 12 हजार 449 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. याचवेळेस साडेसात लाख सेवानिवृत्तांना देखील दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ज्या पोटी बँकर्सना दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पेलावा लागणार आहे. बँक कर्मचारी (Bank Employees) अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles