राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांच्यातील वाद अहमदनगर जिल्ह्यात नाही तर राज्यात सर्व प्रचलित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड एमआयडीसीवरून दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध चांगलेच रंगले होते. दोन्ही आमदारांमधील हा वाद परिवारात येण्याची चिन्ह दिसू लागली आहे. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पार्थ पवार यांचे स्वागताचे बॅनर लागले आहेत. यानंतर यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांच्या कार्यक्रमाला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हजेरी. त्यासाठी रोहित पवार यांच्या मतदार संघात पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहे. या बॅनर्सवर पार्थ पवार आणि राम शिंदे यांचे मोठे फोटो लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार यांचा हा मतदार संघ असून त्यात पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.