Monday, April 22, 2024

वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्षही झालो असतो… अजितदादा बारामतीकरांसमोर भावनिक

बारामती येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आमचे वरिष्ठ (शरद पवार) मध्यंतरी बोलले मी राजीनामा देतो. आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता. वरिष्ठांच्या इच्छेनंतर आम्ही सर्व नेते बसून आताच्या खासदार (सुप्रिया सुळे) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या इतर नेत्यांना मी विश्वासात घेऊन हे मान्य केलं. पण दोन-तीन दिवसांत काय चक्र फिरली माहीत नाही, ते म्हणाले मीच अध्यक्ष राहतो. आम्ही सातत्याने वरिष्ठांना सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत राहिले नाही तर आपण देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊ. पण त्यालाही विलंब झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.” वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले तर आम्ही चांगले आणि मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? म्हणजे वरिष्ठांच्या पोटी आम्ही जन्माला आलो असतो तर आम्ही चांगले. मग अध्यक्षही झालो असतो, पक्षही ताब्यात आला असता. शेवटी सख्या भावाच्या पोटीच जन्माला आलो ना. म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांच्या विचाराचा खासदार केंद्रात गेला तरच बारामतीकरांची राहिलेली कामे पूर्ण होतील. बारामती-फलटण रेल्वेचे काम पूर्ण होईल. त्यामुळे बारामतीकरांनी केंद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा. त्यामुळे पक्ष चोरला असं जे म्हणत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles