राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती येथे जन सन्मान मेळावा आयोजित करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये रविवारी पहिला मेळावा घेण्यात आला.
याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. “आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न राज्यात प्रलंबित आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो सोडवला पाहिजे. तुमचे वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे? हे सगळे मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते. त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.