शरद पवार गटाला धोबीपछाड देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मंत्रालयाबाहेर लागलेला बॅनर. या परिसरात जो बॅनर लागला आहे त्यावर ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बारामती हा सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा विचार अजित पवार गटाने पक्का केलेला दिसतो आहे. या बॅनरनंतर याच चर्चा आता सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाने नुकतंच कर्जतमध्ये चिंतन शिबीर आयोजित केलं होतं. या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी एक भाष्य केलं होतं. सातारा, शिरुर, रायगड आणि बारातमी या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात हा बॅनर लागला आहे.
‘बारामतीच्या भावी खासदार सुनेत्रा पवार’…मंत्रालयाबाहेर लावलेला बॅनर चर्चेत
- Advertisement -