Tuesday, May 28, 2024

विनोद तावडेंमुळे फडणवीस यांचे राजकीय वजन घटत आहे… त्यांच्यासोबतचे नेते घाबरलेत…

आमदार रोहित पवार म्हणाले, एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात घेण्यासाठी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असूनही विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राचे अधिकार जात आहेत.ते राज्यातले मोठे निर्णय घेत आहेत. यातून फडणवीसांचे राजकीय वजन कमी होत आहे. हे त्यांच्या भाषणातून जाणवते. परिणामी त्यांच्यासोबतचे नेते घाबरले आहेत. यातूनच फडणवीसांच्या मागे फिरणाऱ्या नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.

बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्य प्रचार प्रमुख प्रवीण माने यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यावर पवार म्हणाले, प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे माने यांनी स्वतः मनापासून गेले की त्यांना मारून नेले हे बघावे लागेल. मात्र नेते गेले असले तरी लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना तीन लाखाचे लीड मिळेल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, मी खडसेंबद्दल बोलणार नाही. कारण त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकते. खडसेंची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये टाकू शकते. खडसेंना ब्लॅकमेल केले गेले असावे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles