मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं, त्यांना देखील बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाचं सरकार आलं. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळं तुम्ही मला समजून घेतले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
मी मागेही सांगितले आहे की काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरु होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मी त्यांना काय दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा असे अजित पवार म्हणाले. आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी कोणाचं एकू नका असेही अजित पवार म्हणाले. इतके वर्ष बाकीच्यांचं खूप एकल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला असं काही करुन दाखवतो असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आत्तापर्यंत वरिष्ठांनी सांगेल तसेच काम करत आल्याचे अजित पवार म्हणाले.