भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी बारामतीत प्रचार दौरा केला.सुळे यांची सध्याची परिस्थिती पाहून मला खूप हसायला येते. गाडीत बसून एखाद्याचा रील काढून घ्यायचा, तो लगेच व्हायरल करायचा, हेच त्यांचे काम आहे.’तोंडाने म्हणायचे रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटनकरी’ अशा शब्दात वाघ यांनी सुळेंवर टीका केली.
राज्यात, केंद्रात सत्तेत असतात त्यावेळी त्या सगळं विसरून जातात. मात्र विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवतं, असे वाघ म्हणाल्या. मोठ्या ताई किती बोलणार ? अडीच वर्षे त्या सत्तेत होत्या, त्यावेळी त्यांनी काय केलं? बारामती लोकसभेत यंदा बदल होईल. या निवडणुकीत पवारांची सुनबाई ही दिल्लीला नक्की जाईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.