Saturday, October 5, 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील कार्यक्रमास तीव्र विरोध… मराठा आंदोलक आक्रमक

मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय व्यक्तींना महाराष्ट्रात गाव बंदी केलेली आहे. तशी प्रसिध्दी राज्यभर दिलेली आहे. त्यानंतर देखील कारखान्याचा गळीत हंगाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय व्यक्तींना गाव बंदी आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये,अशी विनंती अध्यक्ष जगताप यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने जमुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल,असा ही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी रोजी होणार आहे. यासाठी कारखान्याने कार्यक्रमाची जंगी तयारी ही केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles