Tuesday, May 28, 2024

बारामतीत मोठं राजकारण….सुप्रिया सुळेंचा प्रचारप्रमुखच अजितदादांना जावून मिळाला…

महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी आज अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतली होती, त्यानंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

दरम्यान आज प्रवीण माने यांनी पत्राकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बळकटीकरणासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles