पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, १९८९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीमधील अनेक नेत्यांची इच्छा होती की मला काँग्रेसकडून बारामती लोकसभेचं तिकीट मिळावं. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी त्यास विरोध केला.
अजित पवार म्हणाले, १९८९ साली विजय कोलते, हिरेमण काका आणि बारामतीतले काही प्रतिष्ठित नेतेमंडळी शरद पवार यांना वर्षा बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, शरद पवार हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते) भेटले. तिथे ही सगळी मंडळी शरद पवारांना म्हणाली, अजितला यंदा बारामतीतून लोकसभेची उमेदवारी द्या. त्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारला तुम्ही इथे पाठवा, त्याला राजकारण करू द्या आणि मी तिकडे काटेवाडीला जाऊन शेती करतो. शरद पवारांचं हे वाक्य ऐकून तोंडात मारल्यासारखे सर्वजण बारामतीला परत आले.