Monday, June 17, 2024

Baramati… बच्चा बडा हो गया है! रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बच्चा बडा हो गया है! रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बारामतीत सुप्रिया सुळे यांना जवळपास ७० हजारांच्या वर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या विजय निश्चित मानला जातो आहे. सुप्रिय सुळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, वरून आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली आहे. पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही, तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय हा शरद पवार यांच्या विचारांचा, सुप्रिया सुळे यांच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन! अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles