Tuesday, May 28, 2024

बैल पोळ्याला बैलालाही एक दिवस सुट्टी देतात. मी ५६ वर्षांत एकदाही सुट्टी घेतलेली नाही…

अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज बारामतीतल्या उंडवडी या ठिकाणी त्यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी अजित पवारांवर तुफान टीका केली.

काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? लोक निवडून कुणी आणले? मंत्रिपदं कुणी दिली? माझं वय काढू नका, मी थांबणारा गडी आहे लक्षात ठेवा. ” असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता टीका केली आहे.
माझे विरोधक आणि इतर काही लोक म्हणत आहेत की माझं वय ८४ झालं आहे. माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे? मी थांबणार नाही. तुम्ही मला चार वेळा मुख्यमंत्री केलेलं नाही. कृषी मंत्री केलेलं नाही. मी ५६ वर्षे काम केलं आहे. एकही सुट्टी घेतलेली नाही. बैल पोळ्याला बैलालाही एक दिवस सुट्टी देतात. मी ५६ वर्षांत एकदाही सुट्टी घेतलेली नाही असाही उल्लेख शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles