Saturday, December 9, 2023

ए.बी. फॉर्मवर सही करेन पण उमेदवारी देणं आपल्या हातात नाही… बावनकुळे झाले हतबल…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रायगड लोकसभा मतदार संघातील अलिबाग येथे संकल्प यात्रेसाठी आले होते. कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधत असताना रायगडच्या खासदारकीच्या जागेसाठी कार्यकर्त्यांनी धैर्यशील पाटील यांच्या नावाच्या घोषणा सुरू केल्या होत्या. मात्र, आता महायुती झाली असून, अजित पवार गट देखील भाजपसोबत आले असल्याने युतीधर्म पाळावे लागणार आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव महायुतीकडून येण्याची शक्यता असल्याने बावनकुळे यांनी यावेळी सावध पावित्रा घेत युतीच्या जागा जिंकून आणायच्या असून, मी फक्त एबी फॉर्मवर सही करणार आहे, उमेदवारीबाबत निर्णय आपल्या हातात नसल्याचे सांगून हात झटकले आणि कार्यकर्त्यांना भानावर आणले. यामुळे भाजप लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविणार नसून, महायुतीचा उमेदवार असेल हे नक्की झाल्याची भावना नेत्यांमध्ये झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d