टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकने गौतम गंभीर याच्यासोबत संपर्क साधला आहे, असा दावा ESPN क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. गौतम गंभीर सध्या आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहेत. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये स्पष्ट चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मे आहे.
राहुल द्रविडनंतर भारतीय संघाला शिकवणी देण्यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागितले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज स्टिफन प्लेमिंग आणि रिकी पाँटिंग यांना दावेदार मानले जात आहे.