व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल आणि तो झोपेतून उठतो. तुम्हाला त्याच्या बेडवर पायाशेजारी दुचाकीचं हँडलबार दिसेल. तरुण हे हँडलबार पकडतो आणि दुचाकीप्रमाणे थेट बेड चालवतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाने बेडला गाडीमध्ये रुपांतरीत केले आहे आणि बेडला चार चाकं बसवली आहेत. त्यानंतर हा तरुण ही चारचाकी बेड गाडी घेऊन थेट टपरीवर जातो आणि चहा पितो. त्यानंतर परत घरी येतो आणि बेड पार्क करून पुन्हा झोपतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल