बीड : मामा आणि भाच्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता. यातूनच दोघांचा वाद उफाडला. यामध्ये मामाने आपल्या ३७ वर्षीय भाच्याचा दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात भर दिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील महसूल कॉलनीत वास्तव्यास असलेले राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयत राजेंद्र आणि त्याचे मामा यांच्यात जागेवरून वाद होता. आरोपी मामाचे अंबाजोगाई शहरात ज्यूसबार आहे. मयत राजेंद्र सकाळी ज्यूसबारवर आला होता. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जोरदार भांडण करत दगड आणि लाकडानी राजेंद्र याच्यावर जोरदार हल्ला केला. राजेंद्रच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. दरम्यान मामाकडूनच भाच्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मामानेच केला भाच्याचा खून; जमिनीच्या वादातून भरदिवसा घडली घटना
- Advertisement -