Thursday, January 23, 2025

अजितदादांनी बीडमधील आमदारांना मंत्री करू नये, संभाजीराजे छत्रपतींची मागणी…

खंडणी प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो वाल्मिक कराड अजूनही खुला फिरतोय, तर आरोपी सुदर्शन घुले फरार आहे अशा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवारांनी इथल्या आमदारांना मंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सात्वनासाठी संभाजीराजे बीडमध्ये गेले होते.

संभाजीराजे म्हणाले की, “महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते? महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर चाललय का? पवनचक्कीच्या गोडाऊनवर सोनवणे यांना दमदाटी केली जात होती. त्याचा जाब विचारासाठी संतोष देशमुख गेले असता त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. यावेळी पोलीस मजा बघत होते. या प्रकरणात पोलिस निरीक्षकाला सहआरोपी करा.”

संभाजीराजे पुढे म्हणाले की, “या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे अजित पवारांनी परीक्षण करावे. या प्रकरणातील आरोपी विष्णूचा चाटे याला वाल्मिकी कराड सपोर्ट करतोय. वाल्मीक कराडवर दाखल असून देखील तो खुला फिरत आहे. सरकारला हे कसं जमतं? पोलिस महासंचालकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली. पण त्यांनादेखील या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles