Tuesday, February 27, 2024

बीडमध्ये कंटेनर- पिकअपचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

बीडच्या मांजरसुंबा – पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप असे पीकअप मधील मयतांची नावे आहेत.

कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता, की अपघातानंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने वाहतुकी खोळंबली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेने महाजनवाडीसह वाघीरा गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles