Saturday, May 18, 2024

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडेंसाठी छत्रपती उदयनराजे भोसले मैदानात…

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कडा ता.आष्टी येथे भाजपा – महायुतीची विराट प्रचार सभा ‘जय भवानी,जय शिवराय’ च्या जयघोषात पार पडली.

माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांच्या एकजुटीने विणलेल्या वस्त्राची चिरफाड करण्याचे पाप काहीजण करत आहेत.अशा भूलथापांना बळी न पडता माझ्या झोळीत सर्वसामान्य जनतेच्या मतांचा आशीर्वाद द्यावा.येत्या १३ तारखेला अनुक्रमांक नंबर १ च्या ‘कमळ’ चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, धनंजयजी मुंडे,रासपा अध्यक्ष महादेवजी जानकर, सुरेश धस, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, आशिष देशमुख, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिक,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles