स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा मुंडे या बीड लोकसभेची निवडणूक लढवत असून त्यांना हिरा हे चिन्ह मिळालं आहे. करुणा शर्मा यांनी यापूर्वी कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवली होती, त्यानंतर आता त्या बीड लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. करुणा शर्मा या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत.
अंबाजोगाई शहरांमध्ये त्यांनी प्रचार यात्रा काढून लोकांना मत देण्यासाठी आवाहन केलं. करुणा शर्मा या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये बीडमध्ये निवडणूक लढवत आहेत.