Thursday, March 20, 2025

मनोज जरांगे म्हणाले…‘या’ नेत्यामुळेच नरेंद्र मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. सध्या बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यादरम्यान ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. आज बीडमध्ये बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. बुडत्याचे पाय डोहाकडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल. गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचे आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या पण तसे होत नाही. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

Related Articles

2 COMMENTS

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles