जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळत नाही, तोपर्यंत मी हार-तुरे अन् फेटे बांधून घेणार नाही,” असा निर्धार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. “राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारीही राज्याचा कृषिमंत्री म्हणून माझ्यावर आहे,” असे मुंडे म्हणाले. परळी मतदार संघातील सिरसाळा येथे कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
दिवाळीच्या आत कितीही संकट आले तरी अतिवृष्टी पैसे मी मिळवून देणार,” असा शब्द मुंडेंनी दिला. “परळी येथील सोयाबीनचे उपकेंद्र सुरू होणार हे कोणी स्वप्नात ही पाहिलं नसेल, सोयाबीनचे उपकेंद्र परळी तालुक्यात आणले अन् लातूरच्या लोकांनी माझ्या पोस्टरला चपलांचा हार घातला. अन् तुम्ही साधा या घटनेचा निषेध देखील केला नाही, माझी आई खूप आजारी आहे.म्हणून लातूरहून विमानाने तिला मुंबईला घेऊन जात असताना तिथल्या लोकांनी आम्हाला काळे झेंडे दाखवले,” अशी खंत मुंडेंनी व्यक्त केली.
तोपर्यंत मी हार-तुरे अन् फेटे बांधून घेणार नाही… कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा निर्धार..
- Advertisement -