Sunday, July 21, 2024

Beed News सरपंच खून प्रकरणी शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष गितेसह 5 जणांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. परळीतील बँक कॉलनीत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर झाले होते. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवलं होतं. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली. तसंच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु, ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles