23 डिसेंबर रोजी बीड मधील पाटील मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळी आढावा घेतला आहे.सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरील प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेला आहे. याच सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. उद्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे. उद्या होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे. अगदी शांततेत ही सभा पार पडणार असल्याचा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.